शिंदखेडा तालुक्यातील दरखेडा येथील कालिंका देवी मंदिर प्रतिष्ठानच्या अध्यक्षास जीवे मारण्याची धमकी
शिंदखेडा : तालुक्यातील दरखेडा येथील कालिंका देवी मंदिर प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी यात्रा उत्सव साजरा केला जातो. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोणा महामारीत यात्रा उत्सव थांबला होता. हया यर्षी यात्रा भरली तोच काही गावगुंड यांनी चक्क प्रतिष्ठानच्या अध्यक्षास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असून शिंदखेडा पोलिस स्टेशन ला फिर्याद दाखल केली असून अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्याने गावगुंड अधिकच बळावले आहे.
सविस्तर वृत्त असे की, शिंदखेडा तालुक्यातील दरखेडा येथील कालिंका माता मंदिर असून सदर मंदिराच्या देखभालीसाठी व व्यवस्थेसाठी कालीका देवी मंदिर प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्था स्थापन केली असून संस्थेमार्फत मंदिराचे देखभाल व दुरुस्तीसाठी लोक वर्गणीतून काम सुरू आहे. दि. १० अप्रैल २०२२ पासुन चैत्र नवरात्री नवमी निमित्ताने कुलदैवत कालिका माता मंदिरात उत्सव आयोजित केला होता. तेथे गावकऱ्यांनी विविध धार्मिक रितीरिवाजानुसार नवस, मानता, शेंडी उतरविण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. गावकऱ्यांनी स्व:इच्छेने मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी प्रत्येकी २१०० रुपये देणगी देण्याचे ठरवले होते. त्यानुसार गावकऱ्यांनी यथाशक्ती प्रमाणे देणगी अदा केली. म्हणुन गावातील यात्रा उत्सव आनंदाने साजरा होत असताना गावातील निंंबा काशिनाथ पवार, सुभाष काशिनाथ पवार , गोपाल विक्रम पवार यांनी मंदिराच्या आवारात गैर इराद्याने धुमाकूळ घातला आणि धार्मिक उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत होते. हे पाहून फिर्यादी गणेश गंगाराम पाटील कालिका देवी मंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हे धावत आले असता अध्यक्षास शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. व तु कोण आम्हाला अडविणारा, तुला कोणी अध्यक्ष केले, तु जर आमच्या आड आला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊ लागले. हे पाहून गावातील ज्ञानेश्वर आधार पाटील यांना समजु लागले तर त्यांना ही शिवीगाळ करू लागले. वरील आरोपी हे दारुच्या नशेत कुलदैवत कालिका माता मंदिराच्या आवारात मातेचे पावित्र्य भंग करून आजच्या धार्मिक व सामाजिक उत्सवाला बेकायदेशीर पणे व दादागिरी ने गालबोट लावण्याचा प्रयत्न केला असून गावकऱ्यांच्या उत्सवाच्या आनंदावर विरजण घालून धार्मिक व सामाजिक कार्याच्या भावनेला ठेच पोहोचविण्याचे कृत्य केले आहे.
सदर घटनेच्या वेळी गावातील अमोल भाऊसाहेब पवार, आधार वेडु पाटील, यांच्या सह अन्य गावातील लोकांनी समजुत घालुन घरी परत जाण्याची विनंती केली. म्हणुन सदरील निंबा काशिनाथ पवार, सुभाष काशिनाथ पवार, गोपाल विक्रम पवार, यांनी मंदिराच्या आवारात मातेचे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश गंगाराम पाटील यांना जिवे मारण्याची धमकी दिली असून सदरील आरोपी पासुन कुटुंबातील सदस्य यास धोका निर्माण झाला असून त्याविरोधात दि. १० अप्रैल २०२२ रोजी शिंदखेडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून अद्याप कोणतीही प्रकारची कारवाई झालेली नाही. म्हणुन आरोपी मोकाट फिरत आहेत. तसेच वारंवार धकमी देत असुन फिर्यादीस संरक्षण मिळावे व न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.अन्यथा धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.