देशाच्या अमृत महोसत्व निमित्ताने मलकापूर शहरातील नामवंत सर्व वकिलांचे स्नेह मिलन
मलकापूर (करण झनके) मलकापूर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने ७३ व्या प्रजासत्ताक दिन तसेच देशाच्या अमृत महोसत्व निमित्ताने मलकापूर शहरातील नामवंत सर्व वकिलांची यांचे स्नेह मिलन घेण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते बजरंग दल विदर्भ प्रांत संयोजक अँड.अमोलजी अंधारे हे होते. मंचावर अध्यक्षस्थानी मलकापुर वकील संघ अध्यक्ष अँड.बाळासाहेब सोमण, प्रमुख अतिथी म्हणून अधिवक्ता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष अँड.अभिजीत एदलाबादकर व विश्व हिंदू परिषद जिल्हासह मंत्री श्रीकृष्ण तायडे, विश्व हिंदू परिषद तालुका प्रमुख संमती जैन हे होते.
यावेळी बजरंग दलाचे विदर्भ प्रांत संयोजक अँड. अमोल अंधारे लोकांना न्याय मिळवून देण्याकरिता वकिल मंडळी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. त्याच्या हे कार्य खुप मोठे आहे व समाजात त्याचे गुण गौरव होने आवश्यक आहे. धर्मांतर रोखणे आणि देशाच्या सर्व भागांमध्ये, विशेषत: आदिवासी भागात प्रतिबिंबांना प्रोत्साहन देणे. सामाजिक समरसतेच्या भावनेला चालना देणे अशिक्षित, मागासलेल्या किंवा साधनहीन समाजातील अत्याचारी लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वावलंभी आणि जागरूक बनवणे. त्यांना हळूहळू स्वयंसेवा करणारे बनतात, हे वातावरण निर्माण करुण कार्य करणे. देशातील धर्मांतरण, लव जिहाद, गो तस्करी, गोहत्या, लैंड जिहाद सध्या ही फार मोठी समस्या आहे. या समस्या सोडविण्याकरिता विश्व हिन्दू परिषद सदैव कार्य करीत आहे व या कार्यात आपन ही सहयोग करावे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष एडवोकेट सोमन या वेळी सर्व वकील मंडळी यांना संबोधनकरताना बोलले की सेवा…सुरक्षा…. संस्कार …. या माध्यमातून विश्व हिंदू परिषद बजरंग दल सदैव कार्य करत असते. वकील मंडळीनी सुद्धा देव, धर्म, देश या कार्यात पूढे आले पाहिजे. कार्यक्रमाची प्रस्थावन अँड अदलाबाद यांनी केली, तर आभार प्रदर्शन विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री सुयोग शर्मा यांनी केले, सूत्रसंचालन विश्व हिंदू परिषद शहर सत्संग प्रमुख दिलीप मालपाणी यांनी केले.
भारत मातेची आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी मलकापुर शहरातील अँड .गोपाल मालपानी, अँड.प्रवीण भोळे, अँड.भंडारी, अँड.विवेक महाजन, अँड केवलसिंह परमारड, अँड अर्चना सुनीत शुक्ला, अँड अंनता कनोळजे, अँड.श्रीनिक नाहार, अँड शुभांगी कंडारकर, अँड. अश्विनी, अँड राधिका हस्तक, किशोरसिंग राजपूत, अँड.दीक्षा सुनील अग्रवाल, अँड.श्रिया प्रमोद अग्रवाल, अँड.दर्शन दिलीप अधिवक्ता मंडळी उपस्थित होते.