महावितरण कंपनीशी संबंधित विविध समस्या मार्गी लावण्यासाठी प्राजक्त तनपुरे यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन
धुळे (विक्की आहिरे) धुळे मतदार संघातील महावितरण कंपनीशी संबंधित विविध समस्या मार्गी लावण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. महावितरण संचालक, व्यवस्थापकीय संचालक, प्रकल्प अधिकारी, मुख्य अभियंता जळगाव, अधीक्षक अभियंता, धुळे उपस्थित होते.
थकबाकी वसुलीतुन निर्माण झालेल्या ‘कृषी अकस्मितता निधी (ACF), शेती पंप ग्राहकांना विज जोडणीसाठी असलेली योजना, कृषीपंप वीज जोडणी, धोरण उच्चदाब वितरण प्रणाली (HVDS), आदिवासी पाड्यावर वीज जोडणीसाठी असलेली आदिवासी घटक योजना, सौर ऊर्जा प्रस्तावित १३२ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र आणि ट्रांसफार्मर समस्या आधी विचारांवर चर्चा झाली. ऊर्जा राज्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घातल्याने आगामी काळात वीज वितरण कंपनी शी संबंधित प्रलंबित समस्या मार्गी लागतील आणि शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या त्रास कमी होईल याची खात्री आहे.