शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावाचा प्रश्न पेटला ; विविध प्रकारच्या संघटना करताय कारवाईची मागणी
शिदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावातील ठिकाणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील निबांचे झाड हम कायदा वन खात्याकडून कुठलीही परवानगी न घेता पत्नी सरपंच असलेल्या सरपंच पतिने माझ्याकडे किती पावर आहे आणि परिसरातील लोकांना दादागिरी करून झाड तोडण्यात आली. तरी जिल्हाधिकारी यांना व वन खात्याला आपणास विनंती आहे की लवकरात लवकर पत्नी सरपंच असलेल्या पतीचा माज योग्य ती कारवाई करून उतरण्यात यावा अन्यथा वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हाभरात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे.
झाडांची पाहणी करताना योगेश जगताप वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हाध्यक्ष), राहुल पाटोळे (वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष), अजय पानपाटील (वंचित बहुजन आघाडी), विकी खाटीक, तसेच गावातील ग्रामस्थ आणि समाज बांधव व महिला देखील उपस्थित होत्या. त्यांना समजून सांगण्यात आलं की लवकरात लवकर सरपंच प्रतिनिधी सतीश बेहेरे व सरपंच व ग्रामसेवक सदस्य यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपाचे आंदोलन देखील करेल.