सिल्लोड येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे चौक येथे स्मारक व सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न
सिल्लोड येथिल बाळासाहेबांचे स्मारक तमाम शिवसैनिकांना प्रेरणादायी ठरेल : राज्यमंत्री अब्दुल सत्तार
सिल्लोड (विवेक महाजन) येथे उभारण्यात येणारे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक तमाम शिवसैनिकांना प्रेरणा देणारे एक शक्तीस्थळ असेल असे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे केले.
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सिल्लोड नगर परिषदेच्या माध्यमातून आज येथील स्व. बाळासाहेब ठाकरे चौक येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व सुशोभीकरणाचे भूमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी होते तर मुर्डेश्वर संस्थानचे पिठाधिश प.पु.ओंकारगिरी महाराज, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, किशोर अग्रवाल, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, पंचायत समिती सभापती डॉ. संजय जामकर, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख दीपाली भवर, शकुंतलाबाई बन्सोड, मेघा शाह , युवासेनाचे शेख इम्रान ( गुड्डू ) शिवा टोम्पे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मराठवाड्यात सिल्लोड येथे सर्वाधिक सूंदर हे स्मारक असेल येत्या वर्षी पर्यंत हे स्मारक पूर्णपणे साकारण्यात येईल. येणारी बाळासाहेबांची जयंती याच ठिकाणी साजरी केल्या जाईल असा विश्वास व्यक्त करीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे चौक येथे स्मारक व सुशोभीकरण करण्यासाठी एक मताने ठराव घेतला याबाबद्द नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष , नगरसेवक व अधिकाऱ्यांचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आभार मानले.
महाराष्ट्रासह देशामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदरस्थान आहे. मराठी माणसाला न्याय देण्यासह 1995 ते 1999 साली सत्तेचे सूत्रे आपल्या हाती असतांना राज्यात अनेक जनहितार्थ निर्णय घेण्यात आले. सर्वसामान्यांना न्याय देण्यासह वाडीवस्त्यांचा विकास साधण्यात आला. त्याच पद्धतीने आज मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे काम करीत असून त्यांच्या कार्यपद्धती मुळेच सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा वंदनीय बाळासाहेबांनी दिलेल्या मूलमंत्राचे पालन शिवसैनिकांकडून कायम होत आले आहेत. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघात विकास कामांसह सामाजिक उपक्रम राबविले असे स्पष्ट करीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक ऊर्जा स्थान असल्याचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी म्हणाले.
सिल्लोड नगर परिषदेने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीची आठवण ठेवून आज बाळासाहेबांच्या चौकाचे सुशोभीकरण करण्यासह येथे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला याबद्दल आभार व्यक्त करीत जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास नगरसेवक विठ्ठल सपकाळ, रईस पठाण, शंकरराव खांडवे, मतीन देशमुख, प्रशांत क्षीरसागर, रसुधाकर पाटील, बबलू पठाण, संजय मुरकुटे, वर्षा पारखे, अनवी सरपंच डॉ. दत्ता भवर, प्रवीण मिरकर, आशीष कुलकर्णी, दीपक वाघ, वैभव बन्सोड, कैलास इंगे, सतीश पैठणकर, आनंद पैठणकर आदी उपस्थित होते.