माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या उपोषणास यश
१ लाख ३४ हजार ४३६ रुपये वसूलीचा प्रस्ताव जिल्हा परिषद सादर केला
बोदवड (सतीश बाविस्कर) तालुक्यातील नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम व बाबुराव लक्ष्मण निकम यांनी निमखेड शिवारातील गट क्रमांक १६३ मध्ये सामाईक पैकी ९० आर क्षेत्रांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचे अनुदान घेतले होते. परंतु, १ विहीरीचे खोदकाम व बांधकाम केले होते. व १ विहिरीचे अनुदान लाटून ग्राम रोजगार सेवक पदाचा दुरुपयोग केला होते याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने तक्रार दि.०४/१०/२०२१ रोजी दाखल केली होती.
या तक्रारांरीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी समक्ष स्थळ पाहणी करून चौकशी अहवाल प्रथम दर्शनी अहवाल मध्ये १ लाख ३४ हजार ४३६ रुपयेची वसुली पात्र रक्कम आहे. असे उपमुख्यकार्यकारी अधिकारी जळगाव जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने तक्रार व वारंवार पाठपुरावा करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याने दि.१ रोजी आमरण उपोषण करण्यात आले होते.
वसुली पात्र रक्कमेचा अहवाल दिल्याने व गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी पुढील कारवाई विलंब होणार नाही व चौकशी अहवालात बदल करू असे तोंडी आश्वासन दिल्याने आमरण उपोषणाला रात्री ९ वाजता स्थगिती देण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुकाध्यक्ष चेतन पाटील, संघटक गजानन पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन आसने उपस्थित होते.