महाराष्ट्र
बोदवडला महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त दारू विक्री जोरात सुरू
बोदवड (प्रतिनिधी) येथील बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेले मनोज वाईन शॉप व मलकापूर रस्त्यावर असलेले देशीबार तसेच बोदवड मधील सर्व देशीबार वर अवैधरीत्या महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त देशी दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याचे चित्र समोर दिसून आले.
याबाबत दारू पिणारे मात्र खुश दिसून आले. परंतु त्यांना या गोष्टीची खंत होती की जी दारु पन्नास रुपयाला मिळायची ती दीडशे रुपयाला मिळत होती. त्यामुळे दारूचे रेट नेहमीप्रमाणे असायला पाहिजे होती तर मजा आली असती अशी गुप्त चर्चा दबक्या आवाजात दारू पिणाऱ्यांमधे केली आहे. परंतु याबाबत संबंधित दुकानदाराने दारूचे जास्तीचे रेट न घेता त्याच रेटमध्ये दारू विकण्यासाठी नियंत्रण ठेवावे अशी चर्चा मद्यपी शौकिनामधे केली जात आहे.