वरखेडेचे गजेंद्र पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या तब्बल ५०० लाभार्थ्यांचा दोन डिपीआर मंजुर
धुळे (प्रतिनिधी) हद्दवाढ गावासह शहरातील पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज केलेल्या लोकांचा २५० आणि २५० असे एकुण ५०० लाभार्थ्यांचा डिपीआर क्र ३ व क्र ४ असे दोन वेगवेगळे डिपीआर मंजुर झाले आहेत.
तरी सुरुवातीला निधी मागणीचे पत्र पाठविण्यात आले. त्यात फक्त एकच २५० लाभार्थ्यांचा डिपीआरक्र ३ चा उल्लेख झाला होता. परंतु, वरखेडे गावाचे पत्रकार तथा धुळे ग्रामीणचे संपादक गजेंद्र नारायण पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे २५० नाही तर ५०० लाभार्थ्यांचा दोन डिपीआर क्र ३ व ४ मंजुर झाल्यांचे सांगण्यांत आले. तेव्हा पत्रकार गजेंद्र नारायण पाटील यांनी आंनद व्यक्त केला. माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पंतप्रधान आवास योजनेसाठी तब्बल ५०० लाभार्थ्यांचा डिपीआर क्र ३ व ४ मंजुर झाला हे विशेष म्हणावे लागेल तरी सदर डिपीआर क्र ३ व ४ योजनेला चालना मिळावी यासाठी लागणाऱ्या निधीसाठी शासनाकडे मनपाकडून निधी मागणीचे पत्र आजच दि. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी पाठविण्यांत आले.
पंतप्रधान आवास योजनेला चालना मिळण्यांसाठी निधीची आवश्यकता आहे त्यासाठी शासनाकडे निधी मागणीचे पत्र पाठविणे गरजेचे असल्यांचे मनपा आयुक्त देविदास टेकाळे यांना सांगितले त्यांनी जातीने दखल घेवून आज दि. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी मनपाकडून निधी मागणीचे पत्र शासनाकडे पाठविले आहे. शासन सदरचा निधी म्हाडाकडे पाठवेल आणि मग म्हाडा मनपाकडे देईल.