चोपडा

अवैध गुरे वाहतुकीचे वाहानाने चारचाकी वाहनास धडक ; एक गोऱ्हा मृत्यूमुखी

चालक विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चोपडा (विश्वास वाडे) वैजापूर कडून चोपडा शहराकडे भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा ४०७ कंपनीची गाडी क्र. एम एच ०४ बी यू ६५६४ या गाडीत ११ गोऱ्हे दाटीवाटीने त्यांना वेदना होतील अशा रितीने जखळून बांधून कत्तल करण्याच्या उद्देशाने भरले होते. सदर वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या बलेनो गाडी क्र. एम एच १९ डि व्ही २७९६ हिस चालक साईडने ठोस मारून स्वतःच्या ताब्यातील गाडी रोडवर पलटी झाल्याने सदर गाडीतील ११ गोऱ्हे पैकी एक गोऱ्हा दबून मरण पावला आहे.

पो. ना. हेमंत मोहन कोळी चोपडा शहर पो स्टेशन यांच्या फिर्यादीनुसार, स्वतः पो ना हेमंत कोळी तसेच पोहेकॉ जितेंद्र सोनवणे, पो हे कॉ दिपक विसावे, पो हे कॉ हरिष पवार, पो ना संतोष पारधी, पो का शुभम पाटील, पो का विजय बच्छाव, पो का प्रमोद पवार, पो ना महेन्द्र साळुंखे, पो ना संदिप भोई, पो कॉ रवि बोरसे, पो कॉ विजय बछाव, पो कॉ आत्माराम अहिरे असे पोस्टेला हजर असताना पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांना समीर शहा दिलावर शहा रा. सानेगुरुजी वसाहत चोपडा हा त्याचे ताब्यातील ४०७ टाटा कंपनीची गाडी क्र.एमएच -०४, बियु-६५६४ हा बिना परवाना ११ गुरे दाटीवाटीने भरुन त्यांना वेदना होतील अशाप्रकारे जखळून बांधून कत्तलीचे उद्देशाने वाहून घेवून जात आहे अशी बातमी मिळाली असून सदर बाबीची खात्री करण्यासाठीं पंच व पोलीस स्टाफ खाजगी वाहनाने नागलवाडी रोडने नागेश्वर मंदीराजवळ थांबलो असता ११:३० वा च्या सुमारास वैजापुर गावाकडून ४०७ टाटा कंपनीची गाडी भरधाव वेगात येताना दिसली तोच चोपड़ा कडुन सुझुकी बलेनो कंपनीची पांढरे गांची गाड़ी क्र. एम एच १९ डीव्ही- २७९६ ही त्याच साईडने येत असतांना गाडीवरील ड्रायव्हरने गाड़ी वेगात असल्याने त्याचेने गाडी कट्रोल न झाल्यामुळे गाडी झोला मारत समोरन येणारे बलेनो गाडीवर ड्रायव्हर साईडने बोनट पत्रावर आदळून रोडवर क्लिनर साइंडने पलटी झाली. सदर गाडीची झाडाझडती घेतली असता सदर गाडीत ११ गोऱ्हे दाटीवाटीने त्यांना वेदना होतील अशा रितीने जखळून बांधलेले आढळले. त्यांचेतील एक गोऱ्हा सुमारे ४ वर्ष वयाचा काळपत तपकीरी रंगाचा, उभे शिंगाचा अपघातामुळे मार लागुन मयत झालेला आढळून आला.

पोहेकॉ जितेंद्र सोनवणे यांनी अवैधरित्या वाहन चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव समिरशहा दिलावर शहा वय २५ रा. सानेगुरुजी वसाहत चोपडा असे सांगीतले. त्यास गुरे वाहतुकीचा परवाना विचारला असता नसल्याचे सांगीतले तसेच त्याचे ड्रायव्हींग लायसन्स मागीतले असता गाडी चालवण्याचा परवाना नसल्याचे सांगीतले. सदर गाडीतील गुरे वेले येथील गो शाळेत पाठविण्यात आले आहेत. टाटा ४०७ कंपनीची गाडी पलटी झाल्याने तीचे देखील बरेच नुकसान झाले आहे तसेच बलेनो गाडीचे देखील ५००००/-रु पर्यंत नुकसान झाले आहे गाडीतील एअर बेग वेळेवर उघडल्याने जीवित हानी टळली असल्याचे गाडी मालक बारेला यांनी सांगितले

गुरांना गोशाळेत पाठवून सदर इसमास कारवाई कामी ताब्यात घेतले आहे तसेच दोन्ही वाहने तांत्रीक तपासणी कामी ताब्यात घेण्यात आले आहेत. सदर घटनास्थळीचा पंचनामा पोहेकॉ जितेंद्र सोनवणे यांनी जागेवर केला आहे. .चोपडा शहर पोस्ट भाग ५ गुरन ४०/ २०२२ भादवी कलम २७९,४२९,४२७ व प्राणी क्रूरता वागणुक प्रतीबंध कायदा कलम (क), (घ), (ड) ५ (अ) (ब) सह मोटर व्हिकल अॅक्ट कलम ८३/१७७,११९,१८४,३/१८१ अन्वये प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे. मृत गोऱ्ह्याच्या पंचनामा पशू वैद्यकीय अधिकारी डॉ संजय गुजराथी यांनी केला आहे. सदर घटनास्थळी वाहन उचलण्यासाठी नगर पालिकेने तात्काळ जेसीबी उपलब्ध करून दिले. एकुण ३,४५००० रु कि. चे. त्यात ३,००००० -रु कि.ची टाटा ४०७ कंपनीची गाड़ी व ४५०००/-रु कि.चे १० गुरे असा उल्लेख करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ जितेंद्र सोनवणे हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे