भुसावळ डिव्हिज़नचे सावदा स्टेशन ते आदर्श नगर, नवी दिल्ली येथे किसान रेल्वे सुरु
सावदा (प्रतिनिधी) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा शेती माल देशातील इतर राज्यात विक्रीसाठी सुरू करण्यात आलेली “किसान रेल”ची सुरुवात करण्यात आली होती.
सेंट्रल रेल्वेच्या १००० व्या किसान रेल काल दि. ०३ फेब्रुवारी रोजी भुसावळ डिव्हिज़नचे सावदा स्टेशन ते आदर्श नगर, नवी दिल्ली येथे सुरु झाली. सदर ट्रेनला कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर, रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव, रेल्व राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्रालय नवी दिल्ली येथुन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
सदर किसान रेलद्वारे शेतकऱ्याच्या शेतातील मालाला थेट व्यापाऱ्यांना विक्री करून पाठविण्यात येत असुन त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापक बाजारपेठ मिळण्यासोबत त्यांच्या मालाला चांगला भाव मिळून त्यांचा फायदा होत आहे. सदर योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून याद्वारे मोदी सरकारची शेतकऱ्यांना प्रती असलेल्या कळवळीला दर्शविणारी आहे.
सदर कार्यक्रमाचे मध्य रेल्वेतर्फे सावदा रेल्वे स्टेशन येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदर कार्यक्रमास परिसरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.