आजच करुन घ्या आपले नवदुर्गा मंडळाची नोंदणी अन्यथा अडचणीत पडाल- डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे
भुसावळ:अखिलेशकुमार धिमान

दिनांक – १७ सप्टेंबर २०२२
भुसावळ – पुढील आठवड्यापासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे. भुसावळ पोलीस उपविभागामध्ये साधारणपणे २५० पेक्षा जास्त सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ आहेत.
या सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांनी सिटीजन पोर्टलवर परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे. जेणेकरून सदर अर्जाची छाननी करून त्या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे नगरपालिकेचे अधिकारी/ कर्मचारी प्रत्यक्ष भेट देऊन अर्जाच्या परवानगीची प्रक्रिया सुरु करतील.त्यामुळे सर्व दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी उद्यापासून लवकरात लवकर आपल्या मंडळासाठीच्या परवानगी चे ऑनलाईन अर्ज सादर करावे. या संदर्भात कोणतीही अडचण असल्यास संबंधित पोलीस स्टेशनला भेट द्यावी.
ऑनलाइन अर्ज सादर करताना खालील बाबींची आवश्यकता असते.
•मंडळाची कार्यकारणी
•मूर्तीची उंची
•विसर्जन मिरवणुकीचा मार्ग -विसर्जन मिरवणुकी दरम्यान वापरले जाणारे वाहन
•विसर्जन मिरवणुकी दरम्यान वापरले जाणारे वाद्य
•उभारण्यात येणारे स्टेट ची लांबी, रुंदी,उंची ई.
•मंडळाचे स्वयंसेवक
•उत्सव कालावधी दरम्यान आयोजित केला जाणारा कार्यक्रम इ.
Touch Link for Registration👇
https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/index.aspx
वरील प्रमाणे सर्व माहिती अद्ययावत करून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करावे. जेणेकरून वेळेत परवानगीची कार्यवाही करणे सोपे होईल असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.