शिक्षिकेच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त व हनुमान सेनेच्या वतीने रक्तदान शिबीर
बुलढाणा (करण झनके) मलकापूर तालुक्यातील सामाजिक संघटना हनुमान सेना अलीकडच्या काळात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे. दवाखान्या संदर्भात, रक्तदान जनजागृती, तरुण युवकांमध्ये हनुमान चालीसा पठण, मंदिरावर साऊंड सिस्टिम वाटप, कोरणा काळामध्ये सनीटायझर व मास वाटप, युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे विविध सामाजिक उपक्रम मलकापूर तालुक्यामध्ये राबवत असते.
त्याच उपक्रमा अंतर्गत आज हनुमान सेनेच्या संपर्क कार्यालयांमध्ये नूतन इंग्लिश स्कूल मलकापूर येथील शिक्षिका वैशालीताई मिलिंद धोरण यांनी यांच्या मुलीच्या (दिव्या मिलिंद धोरण) वाढदिवसानिमित्त रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कार्याला हनुमान सेनेतर्फे मानाचा मुजरा एक स्त्री राहून रक्तदान करण्यासाठी पुढे येत आहे. ही एक अभिमानास्पद बाब लक्षात घेता पुरुषांप्रमाणे स्त्रियाही रक्तदान करू शकतात हे त्यांनी आज रक्तदान करून एक स्त्रियांसमोर आदर्श ठेवला. त्याप्रसंगी हनुमान सेनेचे अमोलभाऊ टप, नानाभाऊ येशी, सागर भाऊ बेलोकार, विवेक धोरण, प्रशांत पाटील ई. हनुमान सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.