जळगाव जिल्हा
एक हात मायेचा..! डॉ भुषण मगर यांचे विद्यार्थ्यांनी मानले आभार
जळगाव (प्रतिनिधी) संपूर्ण जळगाव जिल्हयात प्रचीती असलेले नावं म्हणजे डॉ भुषण मगर यांचे अनेक सामाजिक कार्य आता जिल्ह्यांत परीचीत आहे. अनेक दिवसांपासून करूणांने देशात नाही तर संपूर्ण जगात धुमाकूळ घातला होता त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला. विद्यार्थ्यांच प्रचंड नुकसान झाले.
हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून डॉ भुषण मगर यांनी संपूर्ण जळगाव जिल्हयातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत एमपीएससी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस बॅकींग,या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत आॅनलाईन व आॅनलाईन क्लासेस व्यवस्था जळगाव येथे करण्यात येत आहे. या उपक्रम बद्दल डॉ भुषण मगर यांचे अनेक विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत.