राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडियाचे शिवराज पाटील पदावरून कार्यमुक्त
मुक्ताईनगर (सचिन झनके) राजकीय वर्तुळामध्ये अजून एक खळबळजनक घटना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील यांना पदावरून हटविण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी त्यांना कार्यमुक्त पत्र दिलेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील कार्य करत असून मुक्ताईनगर येथे दोन महिन्यापूर्वी सोशल मीडियात पोस्ट टाकण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाला सुरुवात झाली. असता या वादाला कुठेतरी ठिणगी व राष्ट्रवादी शिवसेना यांच्यामध्ये कुठलाही वाद विकोपाला जाऊ नये त्या वादानंतर खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद विकोपाला जाऊन राज्यात महाविकासआघाडीतील प्रतिमा मलीन झाली होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी सोशल मीडिया चे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील यांना पदावरून कार्यमुक्त केलेले आहे. तसेच पत्र काही दिवसांपूर्वीच त्यांना देण्यात आलेले आहे. मुक्ताईनगर वाद आणि पक्षश्रेष्ठींकडून होणाऱ्या विचारा नि तून हा निर्णय घेण्याची चर्चा आहे शिवराज पाटील हे खडसे गटाचे समर्थक असल्याने हा आदेश खडसे गटासाठी एक धक्का दिसून येते.