महाराष्ट्र

धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तज्ञ संचालकपदी डॉ. एस.टी. पाटील यांची नियुक्ती

धुळे (करण ठाकरे) धुळे येथील धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन माजी नगरसेवक डॉ. एस. टी. पाटील यांची धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर तज्ञ संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल चे महाराष्ट्राचे माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी सत्कार केला.

याबाबत सविस्तर क्टर वृत्त असे की, धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी सेच बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणूकीत सर्व पक्षीय पॅनलने विजय मिळविला राजेंद्र होता. त्यानंतर बँकेच्या चेअरमनपदी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची निवड झाली. दरम्यान नुकतीच बँकेच्या कार्यकारिणीवर तज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आली. त्यात डॉ.एस. टी. पाटील यांची तज्ञ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार कुणाल पाटील डॉ. एस. टी. पाटील हे काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी असून ते माजी नगरसेवक आहेत. दरम्यान धुळे येथील रिमांड होमचे सचिव तर श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. नुकतेच डॉ. पाटील यांना जिल्हा बँकेचे चेअरमन माजी आ. राजवर्धन कदमबांडे यांनी तज्ञ संचालक म्हणून नियुक्तीच पत्र प्रदान केले आहे.

डॉक्टर एस. टी. पाटील यांचा माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सचिव डॉ. दरबारसिंग गिरासे, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, बाजीराव पाटील, माजी जि.प. सदस्य साहेबराव खैरनार, अवजड वाहतूक कॉंग्रेस सेल जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, स्विय सहाय्यक सुनिल देशमुख, दिपक गुजर, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे