जळगाव जिल्हा

भुसावळ रेल्वे स्टेशनवर रोजे़दार प्रवाशियांना मोफत सेहरी व्यवस्था

भुसावळ (अखिलेशकुमार‌ धिमान) ईस्लामिक कैलैंडरनुसार नववा महिना म्हणजे मुस्लीम बांधवांच्या उपवासाच महिना. यालाच ‘रमजान’चा अर्थात ‘बरकती’चा महिना म्हणतात. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढविणारा हा महिना. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना. माणसाला वाईटापासून, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना. या महिनचे महात्म्य.

सद्या ३ तारखेपासुन सुरु असलेले पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजे(उपवास) ठेवतात पहाटे सेहरी करुन व दिवस भर पाणी चा एक थेम सुद्धा न घेत असा हा रोजा केला जातो. त्या अनुषंगाने प्रवास करणारे रोजेदारांसाठी सेहरी हा एक मोठा प्रश्न? परंतु भुसावळ शहरातील काझी प्लॅाट येथील मस़्जिद-ए-आले इमरान ह्या संस्थेकडून हर कदम इंसानियत के लिये असा एक उत्तम प्रकल्प म्हणुन रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवासी व रेल्वे प्रवासी रोजेदार यांना मोफत सेहरी वाटप करण्यात येत आहे. ज्यामध्ये पोळी-भाजी, दाळ-भात, केळे, खजूर, लस्सी, व मिनरल वाटर बाॅटल असा पोटभर जेवण आहे शेकडो रोजेदार प्रवासी याचा लाभ घेत आहे. संपूर्ण परिसरात मस़्जिद-ए-आले इमरान ह्या संस्थेचे कौतूक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे