चोपडा

डॉ. चंद्रकांत बारेला यांची आदिवासी विभागाच्या यावल प्रकल्पस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी

चोपडा (जि.जळगांव) : विश्वास वाढे, तालुका विशेष प्रतिनिधी

चोपडा : येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकीत, जनसेवा हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रकांत जामसिंग बारेला यांची नुकतीच महाराष्ट्र शासानाच्या आदिवासी विभागामार्फत यावल येथील प्रकल्पस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये ३० आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील योजना / कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी प्रकल्पस्तरीय (नियोजन आढावा) समित्या स्थापन करुन त्यांची रचना व कार्यकक्षा ठरविण्यात आली असून त्यानुसार या प्रकल्पस्तरीय आढावा समितीच्या अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्याची कार्यपद्धती विहीत करण्यात आली. व प्रकल्पस्तरीय ( नियोजन आढावा) समित्यांच्या रचनेमध्ये बदल करण्यात आला. त्याअनुषंगाने सदर प्रकल्प समित्यांवर अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली व तसा शासन आदेश संबंधित विभागामार्फत काढण्यात आला आहे.
यामध्ये आदिवासी विभागाच्या यावल प्रकल्पस्तरीय अध्यक्षपदी चोपडा येथील प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. चंद्रकांत जामसिंग बारेला यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड हि राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. के.सी.पाडवी यांच्या आदेशाने करण्यात आल्याचे समजते. डॉ.चंद्रकांत बारेला हे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुद्धा कार्यरत असताता. त्यामुळे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर पंचक्रोशीतुन अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे