मास्टर दीनानाथ यांच्यासोबत लतादीदी धुळ्यात आल्या होत्या !
धुळे (करण ठाकरे) थाळनेर या गावाचा भावपूर्ण संबंध मंगेशकर परिवाराशी राहिला आहे. लतादीदी आठ वर्षांच्या असताना मास्टर दीनानाथ मंगेशकर दिवाळीच्या पर्वात धुळे येथे विजयानंद थिएटरला (आताची स्वस्तिक टॉकीज) पृथ्वी थिएटरचे ‘पगला घोडा’ नाटक सादर करण्यास आले होते. सोबत माई मंगेशकर आणि लतादीदी होत्या. दीनानाथांनी धुळ्याच्या गायिका नाजुबाई यांना बहीण मानले होते. म्हणूनच भाऊबीजेची भेट व्हावी म्हणून ते नाटकाच्या निमित्ताने आले होते, अशी आठवण जगदीश देवपूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
‘पगला घोडा’ नाटकाचा पहिला अंक सुरू असतानाच स्टेजच्या पडद्यांना नाशि शॉटसर्किटमुळे आग लागली. सर्व नाटकाचे साहित्य जळाले. कलावंतांचे तेव्ह पोषाखही जळाले. त्यामध्ये आठ चंदन वर्षांच्या लतादीदींचे ड्रेसही जळाले.तेव्हा गल्ली नंबर पाचमधील निर्मला चंदनकर (दिलीपची लांगठे आई) यांचे कपड़े दीदींनी वापरले ही आठवण ४० वर्षापूर्वी दीदींना फोनवर सांगितली त्यांनी भरभरून दाद दिली. दुसरी आठवण त्याचवेळी दीदींना बालमुकुंद शर्मा यांच्या फोनवरून सांगितली “दीदी आम्ही तुमच्या वयाच्या एकसष्टीचा सोहळा तुमच्याआजोळ गावी थाळनेरला रमेश निकम यांच्या ‘स्वरयात्रा’ वाद्यवृंदाद्वारे साजरा केला. रात्री ९ ते १ वाजेपर्यंत चार तास फक्त तुमचीच गाणी ‘दीदी’ आम्ही हजारो थाळनेरकरवासीयांना ऐकवलीत.
सतारीच्या तारा छेडल्या जाव्यात, अशा आवाजाचा आनंद देत दीदी म्हणाल्या, “किती किती आणि कसे कसे विलक्षण प्रेम करतात रसिक माझ्या स्वरांवर… ही तर आई-वडील आणि मंगेशाची कृपा.” दीदींची प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग जयप्रकाश जातेगावकर यांच्यामुळे नाशिकला आला. तो सोहळा ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्काराच्या सोहळ्याचा होता. प्रथम महापौर भगवानबापूजी करनकाळ यांच्यासोबत दीदींचा धुळेकरांतर्फे सत्कार केला. त्यांना धुळे येथे येण्याचे आमंत्रणही रून दिले. त्यावेळी आशा भोसले, अभिनेत्री व्या रेखाही होत्या, अशी माहितीही जगदीश या देवपूरकर यांनी दिली.