बोरी नदीवरील निमगुळ पुलाचे भुमीपजन, दिलेला शब्द पुर्ण केला : आ. कुणाल पाटील
धुळे (प्रतिनिधी) धुळे तालुक्यातील बोरी नदीवरील निमगुळ पुलाचे आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले. आ. पाटील यांनी या कामासाठी एकूण ४ कोटी ४९लक्ष रुपयाचा निधी मंजुर करुन दिला होता. दरम्यान तालुक्यातील जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करायचा असून शेतकरी व सर्वसामान्य जनतेला विकासातून बळ देण्याचे काम करायचे असल्याचे प्रतिपादन आ. पाटील यांनी यावेळी केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, धुळे तालुक्यातील बोरी नदीवर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी आ. कुणाल पाटील यांच्याकडे केली होती. पुलाअभावी येथील शळेतकरी, शालय विद्यार्थी, वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळे आ. कुणाल पाटील यांनी ग्रामस्थांनी मागणी लक्षात घेवून विधीमंडळाच्या अधिवेनशनात या पुलाचा प्रश्न उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधले होते. दरम्यान आ. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेवून निमगुळ पुलाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या सदर प्रस्तावाचा पाठपुरावा करुन पुलाच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले होते. दरम्यान या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट घेवून निधीचीही मागणी केली होती. त्यानुसार निमगुळ ते नवे निमगुळ-खोरदड दरम्यान बोरी नदीवर पुलाला मंजुरी देवून त्यासाठी एकूण ४ कोटी ४९लक्ष ८८ हजार रुपयाचा निधी आ. कुणाल पाटील यांनी मंजुर करुन आणाला होता.
कार्यक्रमात बोलतांना आ. कुणाल पाटील यांनी सांगितले कि, विधानसभा निवडणू कित दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करतांना आज आनंद होत आहे. मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुन या कामाला मंजुरी मिळवून घेतली आहे. हे काम महाराष्ट्र सरकारचे असून कोणी काय काम केले हे जनतेला माहित असते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डा. दरबारसिग गिरासे, अॅड. बी. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आ. कुणाल पाटील यांच्या सोबत शिरुड सरपंच गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे, पं.स.चे माजी सभापती बाजीराव पाटील, माजी जि.प. सदस्य साहेबराव खैरनार, कृऊबाचे मुख्य प्रशासक रितेश पाटील, माजी पं.स. सदस्य पंढरीनाथ पाटील, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, निमगुळ सरपंच सौ. प्रतिभाताई पांडूरंग मोरे, अॅड. बी. डी. पाटील, माजी जि.प.सदस्य विशाल सैंदाणे, रावसाहेब पाटील, निमगुळ माजी सरपंच नवनीत मोरे, माजी पं.स.सदस्य छोटू चौधरी, सायने सरपंच योगेश पाटील, खरेदी विक्रीच व्हा. चेअरमन दिनकर पाटील, शाखा अभियंता नितीन पवार, ठेकेदार सचिन दहिते, संतोष राजपुत, राजीव पाटील, बापू खैरनार, संतोष राजपूत, अनिल पाटील, अविनाश महाजन, गोकुळसिंग राजपूत, कैलास जाधव, बळीराम राठोड, कनिराम पवार, आबा शिंदे, भोलेनाथ पाटील, साहेबराव पाटील, चुडामण मराठे, उत्तम राजपूत, दिपक कोतेकर, दिपक पाटील, विलास पाटील, जनार्दन देसले, फागणे सरपंच कैलास पाटील, माजी सरपंच शिवाजी अहिरे, भाईदास पाटील, राजेंद्र चव्हाण, रविंद्र राजपूत, विजय पाटील, कृष्णा पाटील यांच्यासह शिरुड, निमगुळ, धामणगाव, बोधगाव, बाबरे, कुंडाणे, वेल्हाणे परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच पांडूरंग मोरे यांनी केले तर सुत्रसंचालन भरत नागोडे यांनी केले.