जळगाव जिल्हा

कुऱ्हा येथील घटना : ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्ट सर्किटमुळे खाली असलेले उकिरडे पेटले ; महिलांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

मुक्ताईनगर (सचिन झनके) (शैलेश गुरचळ) कुऱ्हा येथे वार्ड क्र १ मध्ये भरवस्तीत असलेल्या ट्रान्सफॉर्मर ला शॉर्ट सर्किट झाल्याने आजूबाजूचे उकिरडे पेटून आग लागली. मात्र महिलांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

सविस्तर वृत्त असे की, कुऱ्हा येथील वॉर्ड क्र. एक मधील गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोअरवेल जवळील ट्रान्सफॉर्मर वर आज सकाळी अकरा वाजता शॉर्ट सर्किट झाला. जोराचा वारा असल्याने तारांना तारा स्पर्श झाल्याने हा शॉर्ट सर्किट होऊन स्पार्किंग होऊ लागली. आगीचे गोळे खाली पडायला लागले. या ट्रान्सफॉर्मरला उकिरड्यांचा वेढा असल्याने आगीचे गोळे उकिरड्यांवर पडल्याने त्यावरील केर कचऱ्याने पेट घेतला. बघता बघता आग जास्त भडकली आणि जवळच्या घरच्या कुंपणाने पेट घेतला. ट्रान्सफॉर्मर पेट घेणार तोच आजूबाजूच्या महिला धावत आल्या आणि हाताला लागेल त्या भांड्यात पाणी आणून त्यांनी आग विझवली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोअर वेल च्या जवळच मुख्य रहिवास असलेल्या वस्तीत हा ट्रान्सफॉर्मर आहे. या परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उकिरडे टाकले आहेत. पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा होत असलेल्या जागी उकिरडे टाकल्यामुळे घाण असते. नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. याबाबत रहिवाशांनी अनेकवेळा ग्राम पंचायत कडे तक्रारी केल्या तसेच महावितरणच्या कार्यालयातून सुद्धा ग्राम पंचायतीला याबाबत वारंवार लेखी कळविण्यात आले. मात्र ग्राम पंचायतीला त्याचे काही दखल घेतली नाही. ट्रान्सफॉर्मर वर नेहमीच फॉल्ट होऊन वारंवार या उकिरड्यांना आग लागते. आज मोठी आग लागण्यापासून वाचली अन्यथा आजूबाजूच्या घरांचे नुकसान झाले असते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे