महाराष्ट्र

राज्य बाजार समितीची २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीची मतमोजणी करून निकाल जाहीर करा ; उच्च न्यायालयाचे आदेश

पोपटराव सोनवणे यांनी दाखल केली होती याचिका

धुळे (प्रतिनिधी) राज्य बाजार समितीच्या २०१८ साली झालेल्या निवडणुकांची मतमोजणी पूर्ण करून निकाल जाहीर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती याचिकाकर्ता पोपटराव सोनवणे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघ पुणेची पंचवार्षिक निवडणूक जानेवारी २०१८ साली झाली होती, राज्यातील २१ संचालच्या निवडणुकीसाठी १८ मार्च २०१८ रोजी मतदान झाले होते. २१ मार्च २०१८ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार होता.
मात्र महाराष्ट्र सहसंस्थाअधिनियमातील सुधारीत कलमांचा गोपीचंद पांडे उमरेड-नागपुर यांनी सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे याचिका दाखल करून मतमोजणीस स्थगिती मिळवली होती.

विद्यमान संचालक व बाजार समिती संघाचे धुळे नंदुरबार जळगाव या मतदार संघातून उमेदवारी करत असलेले साक्री कृउबाचे चेअरमन पोपटराव सोनवणे यांनी उच्च न्यायालयात मध्यस्थी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने अशा प्रकारची स्थगिती नकार दिल्यानंतर याचिकाकर्त्यानी स्थगितीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सदरनिवडणुकांना स्थगिती न देता निवडणुका घेऊन त्याचा निकाल बंद पाकिटामध्ये ठेवण्याचा आदेश निवडणूक आयोगाला दिला व सर्व प्रकरणांचा अंतिम निर्णय घेण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली. परंतु मतमोजणी केली म्हणजे एक प्रकारे निकाल जाहीर होईल त्यामुळे सदर मतमोजणी करण्यास निवडणूक आयोग टाळाटाळ करत होती, त्यामुळे पोपटराव सोनवणे यांनी उच्च न्यायालयामध्ये मध्यस्थी याचिका दाखल केली.

सदर याचिकेची सुनावणी मंगळवारी झाली. उच्च न्यायालयाने २०१८ साली झालेल्या निवडणुकांची मतमोजणी पूर्ण करूननिकाल जाहीर करावे. तसेच याचिका दाखल करून चार वर्ष स्थगिती असल्याकारणाने निवडणूक लढलेल्या उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून समितीचा कार्यकाल निकाल जाहीर झाल्यापासून पुढील पाच वर्ष म्हणजे २०२७ पर्यंत ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशाचा फायदा निवडणुकीतील निवडून येणाऱ्या सर्व उमेदवारांना मिळणार आहे. या मध्यस्थी याचिकेत याचिकाकर्ता पोपटराव सोनवणे यांच्यातर्फे अॅड. किशोर पाटील व अॅड. अभिजित युवराज पाटील यांनी उच्च न्यायालयामध्ये बाजू मांडली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे