महाराष्ट्र
शिंदखेडा शहरात विविध काॅलनी परिसरात रंगपंचमी उत्साहात साजरी
ढोल तासा, डिजेच्या तालावर थिरकली तहसीलदारासह तरुणांई
शिंदखेडा (यादवराव सावंत) शहरात अनेक ठिकाणी तसेच काॅलनी परिसरात मोठय़ा प्रमाणावर रंगपंचमी साजरी करण्यात आली. कोरोना काळात दोन वर्षे तरुणांना रंगपंचमीचा आनंद लुटता येत नव्हता. यावर्षी मात्र दिलखुलास मस्ती करत आनंद लुटताना तरुणांई दिसत होती. त्यात महिला व ज्येष्ठ नागरिक ही सहभागी झाले होते.केदारेश्वर मंदिराच्या आवारात चक्क रंगपंचमी मध्ये तहसीलदार सुनील सैदाणे देखील सहभागी झाले होते.
याशिवाय दिपक बाविस्कर मित्र मंडळ, बी.के.देसलेनगर, लालचंद नगर, बसस्थानक परिसर, भगवा चौक, शिवाजी चौक, गांधी चौक यासह शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिंदखेडा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ठिक ठिकाणी बंदोबस्त तैनात ठेवला होता.कोणताही अनुचित प्रकार घडला नसुन शांततेत रंगपंचमी साजरी झाली.