धरणगाव येथील अत्याचारग्रस्त चिमुकलीला न्याय मिळावा ; शिरपूर तहसीलदारांना निवेदन
शिरपूर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरामध्ये पाच दिवसांपूर्वी सहा वर्ष व आठ वर्षे वयाच्या २ चिमुकले मुलींवर एका वृद्ध नराधमाने विनयभंग करून अत्याचार केला. त्याचा आज खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने शिरपूर शहर व तालुका, तेली समाज पंच मंडळ शिरपूर, संताजी फ्रेंड्सतर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध करण्यात आला.
यावेळी अत्याचारग्रस्त मुलींना न्याय मिळावा तसेच दोषी असलेल्या वृद्ध नराधमास कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार शिरपूर यांच्याकडे करण्यात आली यावेळी खान्देश तेली समाज मंडळाचे शहर अध्यक्ष नरेंद्र चौधरी, तालुका अध्यक्ष दिनेश चौधरी, सचिव राकेश चौधरी, नगरसेवीका सौ. छायाताई शामकांत ईशी,पिपल्स बैंक संचालक संजय चौधरी,पंच मंडळ (उप) अध्यक्ष राजेंद्र चौधरी, संतोष(आबा) चौधरी, युवराज(बापू) चौधरी, लंकेश चौधरी, भुषण चौधरी, जयेश चौधरी, गोपाल चौधरी, प्रशांत चौधरी, डॉ.विजेंद्र चौधरी, कैलास चौधरी उपस्थित होते.
यावेळी वृद्ध नराधमाचा धिक्कार करीत मंडळाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला व त्यास कठोर शासन करण्यात येऊन अत्याचारग्रस्त चिमुकलींना न्याय मिळवून द्यावे अशी मं.तहसीलदार साहेब शिरपूर यांना विनंती करणारे निवेदन शिष्टमंडळा कडून देण्यात आले.