आमदार अनिल पाटलांच्या प्रयत्नाने प्रभाग आठमध्ये भरून निघतोय रस्त्यांचा अनुशेष
अजून सव्वा तीन कोटींच्या रस्त्यांना मंजुरी दिल्याने आमदारांचा विशेष सत्कार
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्र 8 म्हणजे पिंपळे रोड परिसर व इतर कॉलनी भागात विशेष करुन रस्त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर अनुषेश बाकी असताना तो आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने भरून निघत आहे,त्यातच आमदारांनी अजून 3 कोटी 30 लक्षच्या महत्वपूर्ण रस्त्यांना निधी व मंजुरी दिल्याने प्रभागाच्या वतीने आमदारांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शहराच्या नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांनी देखील पालिकेच्या माध्यमातून या परिसरात विकासकामांचा अनुषेश भरुन काढण्यासाठी मोठा हातभार लावला आहे,गेल्या अनेक वर्षांपासून पिंपळे रस्ता परिसरातील कॉलनी भागातील नागरीक अंर्तगत रस्त्यांच्या समस्येपासून त्रस्त होते,आता मात्र बहुतांश नागरिकांना रस्त्याचा सुखद अनुभव येऊ लागला आहे, आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र 8 मध्ये अजूनही अनेक रस्त्यांची कामे प्रस्तावित असताना आमदारांनी सुमारे 3.30 कोटी निधीतून क स्वामी विवेकानंद नगर, बँक कॉलनी, क्रांती नगर येथिल काँक्रीटीकरण रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळावली आहे, यामुळे स्वामी विवेकानंद नगर परिसरातील समस्त नागरिकांच्या आमदार अनिल भाईदास पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी परिसरातील नागरिक विलास दोरकर, भदाणे , लक्ष्मण निकम, जे.व्ही. शिसोदे, आधार पाटील, प्रा.अशोक पाटील, आर.एल. पाटील, सुरेश धनगर , लोटन पाटील, महेश शिंदे, दहीवदकर, आर.ए.पाटील, चौधरी , राजेश पाटील, बी.यु.पाटील व अँड यज्ञेश्वर पाटील उपस्थित होते.