महाराष्ट्रराजकीय
मोड येथील मेराली याहा भक्त मंडळ ग्रुपच्या ४५ सदस्यांचा भाजपात प्रवेश
बोरद (योगेश गोसावी) तळोदा तालुक्यातील मोड येथील मेराली याहा भक्त ग्रुप सखाराम दामू ठाकरे यांच्यासह ४५ सदस्यांनी शहादा तळोदा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या विकासात्मक कार्याला प्रभावित होऊन भाजपात प्रवेश केला.
सोमावल येथील कै. कलावतीबाई पाडवी फार्म हाऊस येथे आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, प्रभारी नारायण ठाकरे, स्विय सहाय्यक विरसिंग पाडवी, आ.आ तालुकाध्यक्ष दरबारसिंग पाडवी उपस्थित होते.