महाराष्ट्र

टवाळखोरांना नविन ठाणेदार रविंद्र देशमुखांचा इशारा

बुलढाणा (पंकज मोरे) समाजात विकृती पसरवणारे गैर कृत्य करनारे व शाळा कॉलेज परिसरात व चौका चौकात बसना-या टवाळखोरांना बुलढाणा ग्रामीण ठाण्यात नव्याने रुजू झालेले ठाणेदार रविंद्र देशमुख यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. अशा टवाळखोरांवर भर चौकात विशिष्ट पद्धतीने कारवाही करण्यात येईल असा इशारा देखील टवाळखोरांना ठाणेदार देशमुख यांनी दिला आहे

सध्या कायद्याचे राज्य आहे. कायद्याच्या राज्यात कायदेशीर कारवाई करताना जनतेमध्ये काही प्रमाणात गैरसमज होत असतात. हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न मी करेल जनतेला आव्हान आहे की, काही चुकीचे आढळून आल्यास तक्रार करायला तुम्हाला भिती वाटत असेल तर न घाबरता बिनधास्त येथे येवून तक्रार करा, कायद्याचे राज्यात कायदाच मोठा असतो. कुठलिही एक व्यक्ती मोठी नसते त्यामुळे त्यादृष्टीने मनामध्ये कोणीही कोणती ही भिती बाळगू नये कोणावरही अन्याय होत असेल त्यांनी याठिकाणी येवून तक्रार करावी, असे आवाहन बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार रविंद्र देशमुख यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे