तब्बल 16 वर्षांनी धावली भडणे ते दोंडाईचा एसटी बस
शिवसेनेचे तालुकाप्रमुख व सरपंच गिरीश देसले यांच्या प्रयत्नांना यश
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील भडणे हे गाव राजकीय दृष्ट्या राजकारणात नेहमी अग्रेसर आहे . मात्र भडणे सोनशेलु विखरण दोंडाईचा ही बस सेवा सुरू करण्यासाठी येथील ग्रामस्थ सरपंच विद्यार्थी वर्ग यांनी अनेकदा पाठपुरावा करून देखील बस सेवा सुरू होत नसल्यानेच प्रयत्नांची पराकाष्टा केली होती मात्र याचे मुख्य कारण होते ते भडणे ते दोंडाईचा हा रस्ता अतिशय खराब होता.
मागील वर्षापासून भडणे विखरण हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने हम सडक योजने अंतर्गत डांबरीकरण करण्यात आल्याने येते रस्त्याची वर्दळ अतिशय वाढली होती भडणे सोनशेलु विखरण करून येथील विद्यार्थी नेहमी कॉलेजला जाण्यासाठी बस सेवा नसल्यामुळे भडणे सोनशेलु विखरण येथील सरपंच यांनी एसटी महामंडळाला पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष केले जात होते मात्र येथील लोकनियुक्त सरपंच व शिवसेनेचे तालुकाप्रमुख गिरीश देसले ,सरपंच प्रतिनिधी धीरज बडगुजर विखरण,सरपंच महेंद्र पवार उपसरपंच व ग्रामस्थ तसेच राजकीय पदाधिकारी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र परिसरातील ग्रामस्थांनी एसटी महामंडळाला भडणे सोनसेलु, विखरण मार्गे बस सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, एसटी महामंडळाने दखल घेऊन दिनांक 19 जून रोजी दहा वाजता शिवसेनेचे तालुकाप्रमुख गिरीश पाटील स्वतः बस मध्ये प्रवास करून बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भडणे ग्रामस्थांतर्फे वाहक-चालक यांचे ग्रामपंचायत चौकात स्वागत करण्यात आले यावेळी भडणे येथील सरपंच गिरीश पाटील, उपसरपंच जगतसिंग गिरासे, माजी सरपंच अशोक पाटील, भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त,पोलीस पाटील युवराज माळी, पुरुषोत्तम गोसावी, सतीश माळी, विठोबा पाटील, रमेश पाटील ,धनराज पाटील, खुशाल पाटील, नितीन पाटील ,भाऊसाहेब ठाकूर, दयाराम माळी ,अशोक कोळी, सुरेश मगळे ,रामकृष्ण माळी राजेंद्र पाटील, प्रवीण पाटील आदी मान्यवर यावेळी बस गावात येताच फटाक्यांची आतिषबाजी व पेढे देऊन बस चालकांचे व वाहकाचे, योगेश कदम लोकेश बिरादार, यांचे स्वागत करण्यात आले भडणे सोनशेलु विखरण,येथील विद्यार्थी पालक वर्गांनी बस सेवा सुरळीत चालू झाल्याने समाधान व्यक्त केले आहे.