जळगाव जिल्हा
नांद्रा बु येथे जि.प. मराठी शाळेत साफ सफाई मोहीम
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील जि. प. मराठी मुलांची शाळा येथे साफ सफाई मोहीम राबविण्यात आली आहे. यावेळी वाचनालय कट्याचे सदस्यांनी सहभाग नोंदवून दोन टन कचरा साफ करून गोळा केला.
आज रोजी जि. प. मराठी मुलांची शाळा नांद्रा बु येथे साफ सफाई मोहीम राबविण्यात आली. हि संकल्पना हितेश दादा आगीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यात वाचनालय कट्याचे सदस्यांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये सगळ्यांनी मिळून दोन टन कचरा साफ करून गोळा केला. तसेच अशा प्रकारे समाज उपयोगी कामे यापुढेही होतील. त्यात अजुन जास्त संख्येने सहभागी होऊन आपल्या गावाला जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. तसेच यावेळी वाचनालय कट्टा मधील सगळे सदस्य उपस्थित होते.