राजकीय
शिवसेना भवन सोयगाव येथे शिवसेना पक्षाचा 56 वा वर्धापन साजरा
सोयगाव : महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षाचा 56 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख आबासाहेब काळे, नगर पंचायततील शिवसेना गटनेते अक्षय काळे, नगरसेवक संतोष बोडखे, गजानन कुडके, भगवान जोहरे, हर्षल काळे, लतिफ शहा, अशोक खेडकर तसेच राजू दुतोंडे,किशोर मापारी, डॉ.फुसे, रमेश गव्हांडे, शेख बबलू, शरीफ शहा, जावेद पिंजारी,अकील शेख, योगेश नागपुरे सह इतर शिवसैनिकांची उपस्थिती होती.