उपमहापौर सभागृहात कोणत्या अधिकाराने ? ; कैलास सोनवणे आक्रमक
दोन वर्षांनी आज महापालिकेची ऑफलाईन महासभा
जळगाव (प्रतिनिधी) महासभेच्या प्रारंभी शहरातील कोरोना लसीकरणाबद्दल आयुक्तांनी विश्लेषण केल्यावर लगेच कैलास सोनवणे यांनी उपमहापौर सभागृहात कोणत्या अधिकाराने ?, त्यांना सभागृहाबाहेर काढा, अशी मागणी करणारा बॉम्बगोळा टाकला. यानंतर उपमहापौर कुलभूषण पाटील आणि कैलास सोनवणे एकेरीवर आले आणि महासभेत खळबळ उडाली. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीही कैलास सोनवणे यांना प्रत्युत्तर दिले, नैतिकता काढली.
उपमहापौर कोणत्या अधिकारात अधिकाऱ्यांच्या बैठक घेतात आणि फाईल माझ्या मार्फतच मंजूर झाली पाहिजे असे कोणत्या अधिकारात सांगतात ?, असा प्रश्न कैलास सोनवणे यांनी उपस्थित केला होता त्यावर उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले. गैरव्यवहार सिद्ध करा, उद्या सकाळी राजीनामा देतो. तुम्ही पदावर असताना काय केले हे सगळ्या गावाला माहिती आहे. उलट नैतिकता असेल तर कैलास सोनवणे यांनी सभागृहाच्या कामात सहभागी होऊ नये . सोनवणे यांना न्यायालयाने दोषी ठरवलेले आहे. असे उपमहापौर म्हणाले.
त्यावर महापौर जयश्री महाजन यांनी कैलास सोनवणे यांना सूचना केली की, महासभेत उपमहापौर यांनी उपस्थित राहण्याची पद्धत आपल्या महापालिकेत पूर्वीपासून आहे. अजेंड्यावर नसलेले विषय आता का मांडत आहात ? कायद्याने जाता येते. त्यांनतर कैलास सोनवणे म्हणाले त्याप्रमाणे मी भेटीला बोलावलेल्या जोशी नावाच्या व्यक्तीला सभागृहात बोलावा आणि विचारा की, मी जोशी यांना बोलावले का ? त्यांना काय म्हणालो हे त्यांना सभागृहात सांगू द्या. ते तसे म्हणाले तर मी आताच्या आता राजीनामा देतो, असे आव्हानच उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी कैलास सोनवणे यांना दिले.
एवढ्यात एका नगरसेविका घरापट्टीच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी महापौरांकडे परवानगी मागत होत्या. त्यांनाही कैलास सोनवणे यांनी अडवले आणि भूमिका ठाम राहणार असल्याचे सांगितले. त्यावर महापौर जयश्री महाजन म्हणल्या की, आजच्या महासभेत उपमहापौर बसतील तुम्ही आज जो आक्षेप घेताय त्याची पूर्वसूचना कुणालाच नव्हती असा अचानक कोणताच निर्णय घेता येत नाही कैलास सोनवणे उपमहापौर यांच्यावर आरोप करत आहेत. नुसत्या आरोपाने कुणावर कारवाई करता येत नाही आरोप सिद्ध व्हावा लागतो त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले तर पुढचा निर्णय घेतला जाईल उपमहापौर यांच्यावर आता ऐनवेळी आरोप होतो आहे. ते आज सभागृहात बसतील. तरीही कैलास सोनवणे आपल्या आरोपावर आणि भूमिकेवर ठाम होते.
त्यांनतर नितीन लढ्ढा यांनी मध्यस्थी केली. सभागृहाच्या कामाच्या तरतुदीनुसार महासभेचे कामकाज झाले पाहिजे अशी भूमिका नितीन लढ्ढा यांनी घेतली होती. त्यावर कैलास सोनवणे म्हणाले की, चुकीचे काम होऊ द्या अशी विनंती मला नितीन लढ्ढा करतातच कसे ? बऱ्याच गदारोळानंतर अखेर कैलास सोनवणे शांत झाले.