शिंदखेडा शहरातील काॅलनी परिसरात चोरट्यांनी फोडले बंद घरे
शिंदखेडा (प्रतिनिधी) शहरात साईनगर व गुरुकृपा काॅलनीत सुमारे चार पाच बंद असलेली घरे केवळ दरवाजाची कडीकोंडा तोडून चोरट्यांनी असेल त्या वस्तू लंपास केल्याची घटना घडली. सर्वच घरमालक व भाडेकरू लग्न निमित्ताने बाहेरगावी असल्याची माहिती मिळाली आहे. तर पोलिसांना एक प्रकारे आवाहन केले असून काॅलनी परिसरात पोलिसांनी प्रेट्रोलिग वाढवावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
या चोरीतुन फक्त गुरुकृपा काॅलनीत भाडेकरू जि.प.शिक्षक सुरजसिंग भरतसिंग गिरासे यांनीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, अज्ञात चोरट्यांनी दि. २ ते ११ डिसेंबर दरम्यान घरफोडी केली असावी. शेजारच्यांनी आम्हास माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अज्ञात चोरट्यांनी दरवाजाच्या कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यात रोख ३ हजार रुपये, ६ हजार रुपयांची तीन ग्रॅम सोन्याचे रिंग व दोन चारसे रुपये च्या चांदीच्या साखळी असे एकूण ११ हजार ४०० रुपये लंपास करण्यात आले आहेत. याप्रकरणी सुरजसिंग गिरासे या फिर्यादीत दिलेल्या पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोहेकाॅ पठाण पुढील तपास करीत आहेत.