भारतीय किसान सेना पदाधिका-यांच्या नियुक्त्या ; जिल्हा कार्यक्रमात कार्यक्रम
शिरपूर (ॠषिकेश शिंपी) भारतीय किसान सेना (सेक्युलर) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नंदुरबार जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेश महासचिव पंडित तडवी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
नंदुरबार येथे जिल्हा कार्यालयात आज सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश महासचिव पंडित तडवी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नवापूर तालुकाध्यक्षपदी सुनील बापू गावित, नवापूर तालुका कृषी सल्लागारपदी विपुल गावित तर धुळे जिल्हाध्यक्षपदी अंबुरपाडा (उमरपाटा ता. साक्री) येथील देवा कुवर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदेश महासचिव पंडित तडवी यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित प्रदेश प्रवक्ता सुभाष नेरकर, जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, विमुक्त भटके सेल जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव, तालुका उपाध्यक्ष रविदास वळवी, शहराध्यक्ष राजू माळी, सुधाकर वसावे, रवींद्र वळवी, सुनील भिल, भास्कर तडवी, दीपक भिल, अजय भिल, सालम गावित इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.