मायसावंगी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांवर कारवाई करण्यात यावी ; आदिवासी वाल्मीकलव्य सेनेची निवेदनाद्वारे मागणी
बुलडाणा (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील मायसांगवी खु!! या गावातील आदिवासी कोळी जमातीची अल्पवयीन मुलगी शौचास जात असतांना गावातीलच तीन नराधमांनी तीला ओढत नेऊन शेजारीच शेतात ओढत नेले व तीच्यावर तीन्ही नराधमांनी आळीपाळीने लैंगीक अत्याचार केला आणि घरी याची वाच्यता केली तर तिला व तीच्या कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी पिडीत मुली्ला दीली तरीही मोठय़ा हिंमतीने पिडीत मुलीने घरी येऊन संपूर्ण आपबिती परिवाराला सागिंतली.

त्यानंतर नराधमांवर गुन्हा दाखल करुन त्यानां अटक करण्यात आली असुन पिडीत मुलीला न्याय मिळण्यासाठी पिडीत मुलीला व तिच्या कुटूंबाला पोलीस संरक्षण मिळावे,पिडीत मुलीला नुकसान भरपाई म्हणून ५० लाखाची शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी,सदरचा खटला हा जलदगती न्यायालयात चालवून नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी,हा खटला चालवीण्यासाठी विशेष सरकारी वकील ऍड.उज्वल निकम साहेब यांची निवड करण्यात यावी,या नराधमांना जामीन मिळणार नाही असा अहवाल तयार करुन आरोप पत्र दाखल करण्यात यावे या संदर्भात बुलडाणा जिल्हाधिकारी,मलकापूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देतेवेळी आदिवासी वाल्मीकलव्य सेना बुलडाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, मलकापूर गीताताई कटोरकार, महिला जिल्हा प्रमुख उषाताई राजेंद्र तायडे, आशाताई सुभाष सुरडकर, शुभम घुले शहर प्रमुख, संभाजी गवळी मोताळा तालुका प्रमुख, मंगेश इंगळे जिल्हा संघटक, वासुदेव सोनुने तालुका उपप्रमुख, विजय भाम्हंदे तालुका उपप्रमुख, राहुल निशाणकर, ज्ञानेश्वर सपकाळ समन्वय समिती, महादेव कोळी, उमेश जाधव, महादेव बावसकर, भिकाजीं कटोरकार, जिल्हा कार्य अध्यक्ष गणेशभाऊ इंगळे आदी उपस्थित होते.



