खतगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण सोहळा सपंन्न
देगलूर (प्रतिनिधी) मारोती हनेगावे बिलोली तालुक्यातील खतगाव येथे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आमदार अंतापूरकर यांच्या हस्ते आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
खतगाव परिसरातील अनेक गावांना या केंद्राचे आरोग्य सुविधा पुरविण्याने लाभ होणार आहे. पोटनिवडणुकित भरघोस मतांनी आमदार जितेश यांनी निवडून आल्यानंतर अनेक गावांमध्ये विकास कामाचे भूमिपूजन करून फार मोठी निधी उपलब्ध करून देत आहेत. व काल झालेल्या आरोग्य केंद्राचे इमारतीचे लोकार्पण सोहळा पार पडला. यानिमित्ताने मतदारसंघांमध्ये होत असलेल्या विकास कामाबाबत समाधान व्यक्त होत आहे.
याप्रसंगी या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे, जिल्हा परिषद सदस्य मीनल ताई खतगावकर, जिल्हा परिषद सदस्य सुंदराबाई पाटील, बाळासाहेब पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवाजीराव पाटील पाचपिपळीकर, युवा नेते रवी पाटील खतगावकर, पंचायत समिती उपसभापती शंकरराव यंकम, दिलीप पाटील, पांडुरंग रामपुरे, सरपंच पेटेकर, संतोष पाटील,व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.