काटवान भागातील शेतकऱ्यांचा ‘जल आक्रोश मोर्चा’
धुळे (प्रतिनिधी) काटवान भागातील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासुन विकास खुंटला असून शेतकरी समितीतर्फे सिंचन भवन समोर संतप्त शेतकऱ्यांनी ‘जल आक्रोश मोर्चा’ काढला.
यात काटवान भागातील पाटचारींचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासुन प्रलंबित असुन पाटचारीला येणारे पाणी काटवान भागातील बेहेड, विटाई, निळगव्हाण, दारखेल, नाडसे आदी गावांतील शेतीच्या सिंचनासाठी मिळत नाही म्हणून काटवान भागातील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासुन विकास खुंटला आहे. म्हणुन जल आक्रोश मोर्चा करण्यात आला.
यावेळी या मोर्चाला संबोधित करताना महाराष्ट्र किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष बापुसाहेब उत्तमराव देसले, माजी धुळे जि.प.सदस्य बापुसाहेब रमेश अहिरराव, किसान काँग्रेस धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत भामरे, साक्री तालुका किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कपिल जाधव, साक्री युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रज्योत देसले, साक्री तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अविनाश शिंदे, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणिस दिनेश देसले व काटवान भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.