कुस्तीगीर कुमारी हर्षाली सैदांणे सोबत वडिलांचाही सत्कार !
धुळे (प्रतिनिधी) कुस्तीगीर कुमारी हर्षाली सैदांणे हिचा सत्कार राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे करण्यात आला.
कुस्ती क्षेत्रात खानदेशचे नाव सातासमुद्रापार मिळवणारी अनेक पुरस्कारांची मानकरी विविध संस्था आणि संघटनांकडून गौरविलेले कुस्ती कोच खानदेश कन्या कुमारी हर्षाली चंद्रकांत सैंदाणे हिचा काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तांत्रिक अधिकारी कोच म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली एवढेच नव्हे तर या स्पर्धेसाठी तिची चौथ्यांदा निवड देखील झाली असून, खानदेशातून निवड झालेली आज पर्यंत ती एकमेव कन्या आहे. ही बाब खान्देशसाठी भूषणावह असून हर्षाली सैदांणे निवडीबद्दल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी व हुतात्मा दिनानिमित्त धुळे येथील राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे कुमारी हर्षालीचा सत्कार करण्यात आला. तिच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या एवढेच नव्हे तर हर्षालीला उत्तुंग झेप घेण्यासाठी सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन देणारे तिचे वडील चंद्रकांत नाना सैंदाणे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
चंद्रकांत नाना व आई सुनिता सैदांणे यांच्या सारखे पालक सर्वच मुलींना मिळाले तर नक्कीच कुस्ती या क्षेत्रात मुलींचा दबदबा निर्माण होईल, मुली आता कुठल्याही क्षेत्रात करिअर करू शकते पण तिला आपल्या कुटुंबाकडून जास्तीतजास्त सहकार्य मिळायला हवे… हर्षलीच्या वडिलांसारखे विचार प्रत्येक पालकांनी केला तर स्त्री भ्रूण हत्या देखिल थांबतील मुलीचा गर्भ असला की गर्भपात करणारे देखिल समाजात पुष्कळ आहेत. त्यांच्यासाठी हर्षाली व तिचे वडील चंद्रकांत सैदांणे हे एक चांगले उदाहरण समाज पुढे ठेवण्यासारखे आहे. मागील 3,4 वर्षा पूर्वी अमीर खान यांच्या एक सिनेमा होऊन गेला दंगल तसेच आपल्या धुळ्याचे हर्षाली ही पण एक दंगल सारखीच खरीखुरी हिरो आहेच. बस तिला अजून पुढच्या प्रशिक्षणासाठी व जॉब साठी खरी मदतीची, प्रोत्साहनाची गरज आहे..धुळ्याची हर्षालीने दाखवून दिले आहेच मुली या कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. बस त्यांना समाजात मुलांच्या बरोबरीने घेऊन व समजून त्यांनाही वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सर्व समाज घटकाने त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे व मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन देखिल बदलला पाहिजे. म्हणजे मुलगी ही कुठल्याही क्षेत्रात करिअर करून आई वडीलांचे नावलौकिक करेल यात तिळमात्र शंखा नाही.
यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, युवती अध्यक्षा हिमानी वाघ, जिल्हा उपाध्यक्षा प्रितम देशमुख, जिल्हा सरचिटणीस, सरोज पवार, जिल्हा सचिव माधुरी पाटील, उपस्थित होत्या.