महाराष्ट्र
काय सांगता ! ‘या’ स्मार्टफोनवर ‘व्हाॅटस् अॅप’ बंद होणार
मुंबई : स्मार्टफोन युजर्ससाठी महत्वाची बातमी आहे.. आज घडीला जगात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप.. अर्थात व्हाॅटस् अॅप आता जुन्या आयफोनवर चालणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘व्हाॅटस् अॅप’ने आपल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु केली आहे..
‘व्हाॅटस् अॅप’ कंपनीच्या निर्णयानुसार, आता जुन्या ‘आयफोन’च्या व्हर्जनमध्ये ‘व्हाॅटस् अॅप’ची काही फीचर्स बंद होणार आहेत. त्यात iOS 10, iOS 11, iPhone5C आणि iPhone5 यांचा समावेश असून, त्यात आता ‘व्हाॅटस् अॅप’ चालणार नाही.. तंत्रज्ञानात सतत होणारे बदल, युजर्सची सुरक्षितता नि ऑनलाइन धोके लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.