श्री गणेश विद्यामंदिर व माय मदर इंग्लिश स्कूल, लिलावती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये शिक्षक- सुसंवाद -दौरा संपन्न
शहापूर (देविदास भोईर) शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचालित श्री गणेश विद्या मंदिर दातिवली, दिवा या शाळेच्या सभागृहात महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना माननीय शिक्षक आमदार बाळाराम द. पाटील (कोकण मतदार संघ ) यांचा शिक्षक – सु -संवाद दौरा संपन्न झाला.
या कार्यक्रमास संस्थेचे सन्मानीय अध्यक्षा लिलावती लक्ष्मण म्हात्रे तसेच संस्थेचे पदाधिकारी शिवदत्त म्हात्रे, साईनाथ म्हात्रे, दिनेश म्हात्रे, केतकी म्हात्रे, गिता म्हात्रे तसेच गणेश विद्यामंदिर प्राथमिक विभाग, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच माय मदर इंग्लिश स्कूल, बाल जिजाऊ संस्कार केंद्र चे सर्व शिक्षक वृंद व मुख्याध्यापक तसेच शिक्षक आमदारांसोबत देवेंद्र मढवी, दिनकर म्हात्रे, रवी पाटील उपस्थित होते. दिव्यातील ओम साई शिक्षण संस्था, ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल, सेंट मेरी स्कूल, पी.एन बेडेकर स्कूल, दिवा स्कूल यांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती -पूजनाने झाली. दिव्यातील अनेक शाळांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपल्याला येणाऱ्या अनेक समस्या शिक्षक आमदार बाळाराम द. पाटील यांच्या पुढे तोंडी तसेच लेखी निवेदने देऊन मांडल्या. त्यामध्ये प्राधान्याने अघोषित शाळा घोषित करणे, घोषित शाळांचा अनुदानाचा प्रश्न मार्गी लावणे, जुनी- पेन्शन योजना लागू करणे, RTE कायद्याच्या परतावा संबंधित, तसेच RTE नुसार मुलांना मोफत प्रवेश, अशैक्षणिक कामातून मुक्तता, संचमान्यता, वैयक्तिक मान्यता, मुख्याध्यापक मान्यतेचे प्रस्ताव, जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या समस्या, विनाअनुदानित शाळेतील तुकड्या मान्यता या सर्व समस्या त्यांच्यापुढे मांडण्यात आल्या.
या सर्व समस्यांवर नैतिक जबाबदारी म्हणून पाठपुरावा करणार आणि दिव्यातील या सर्व शाळेतील समस्या पूर्णपणे 60 ते 70 % मार्गी लावण्याचे काम एक महिन्यात पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षक आमदारांनी घेतली. त्यासाठी आपण कुठल्याही अधिकाऱ्या ला एकही पैसा देऊ नका. आपण आपल्या समस्या माझ्याकडे लेखी निवदेना द्वारे पोहोचवा असे सांगितले. आणि आज आमच्या दिव्यातील शेवटचा दौरा पूर्ण करतो. असे सांगितले आणि कार्यक्रमाची सांगता समारोपाने झाली.