आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
शिरपूर शहरातील लब्बैक फाऊंडेशनतर्फे उद्या रक्तदान शिबिराचे
शिरपूर (ॠषिकेश शिंपी) शहरातील लब्बैक फाऊंडेशनतर्फे २००९ विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून उद्या दि. ११ रोजी सकाळी ९ ते ५ दरम्यान मोहम्मदीया हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानासाठी पुढे येथील नवजीवन ब्लड बँकेचे सहकार्य लाभणार आहे.
युवकांनी शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष मजहर पठाण, उपाध्यक्ष इवाहिम शेख सचिव पप्पू मुजावर, खजिनदार अबरार शेख, सहसचिव युनूस शेख यांच्यासह सदस्यांनी केले आहे.