देगलूर महाविद्यालयात विद्यापीठ परीक्षेस प्रारंभ
नांदेड (जावेद अहमद) अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी 2021 परीक्षेस प्रारंभ झाला असून त्या सुरळीतपणे चालू आहेत. दररोज 1600 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
या परीक्षा केंद्रावर देगलूर महाविद्यालय देगलूर, वै. धुंडा महाराज महाविद्यालय देगलूर आणि सिंधू महाविद्यालय देगलूर या तीन महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
पदवी स्तरावरील परीक्षा दिनांक 8 फेब्रुवारी पासून चालू असून दि. 22 फ़ेब्रूवारीपासुन पदव्यूतर वर्गाच्या परीक्षा सुरु होत असून पदव्युतर वर्गाचेही 510 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. प्रस्तुत विद्यापीठ परीक्षा दि. 3 मार्च 2022 पर्यंत ह्या परीक्षा चालणार असून परीक्षा केंद्रप्रमुख म्हनुण डॉ बी आर कतुरवार, सहकेंद्रप्रमुख म्हनुण प्रा विनोद काळे, डॉ व्यंकट ख़ंदकुरे व आय टी समन्वयक म्हनुण डॉ भानुदास नरवाडे हे काम करित आहेत.
तर प्रशांत चौव्हाण, अशोक मामिडवार कार्यालय लिपिक म्हनुण काम करित आहेत. अशी माहिती महांविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए. बी. चिद्रावार यांनी दिली आहे.