आरावे येथील भारतीय सैन्य दलातील जवान योगेश कोळी सेवानिवृत्त झाल्याबद्दल जल्लोषात स्वागत
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील आरावे गावातील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान शुर बहादुर सैनिक योगेश नानाभाऊ कोळी यांचा सेवानिवृत्त सन्मान मोठ्या थाटामाटात करण्यात आला व हे सेवानिवृत्त झाले.
त्यानिमित्त गावातील युवकांनी त्यांचा गौरव म्हणून जल्लोषात स्वागत करण्यात आले ते भारतीय सेनेत जानेवारी २००५ साली भरती झाले. त्यांची पहिली पोस्टिंग मणिपूर येथे झाली. व नागालँड, जम्मू काश्मीर, येथे झाली तसेच अनेक ठिकाणी पोस्ट झाली, जम्मू आणि काश्मीर मध्ये ही त्यांनी बरीच वर्षे नोकरी केली आणि तब्बल 17 वर्षे नोकरीची ड्युटी बजावत सेवानिवृत्त झाले. यावेळी त्यांची आरावे गावात मिरवणूक काढली यात गावातील महिलांनी जवानाचे औक्षण केले गल्लीत रांगोळी काढत लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतला तसेच सेवा निवृत्ती निमित्ताने सहपत्नी सत्कार करण्यात आला.
यावेळी शिंदखेडा खान्देशी रक्षक संस्थेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गिरासे, धुळे तालुकाध्यक्ष देवेंद्र बोरसे, तालुका कार्याध्यक्ष नंदलाल साळुंखे, शहराध्यक्ष भाऊसिंग गिरासे, सहसचिव संजीव नगराळे, रक्षक ईश्वर सोनवणे, देविदास कोळी, मुकेश बोरसे, शांताराम बोरसे, दिपक बोरसे, संजय पवार, छोटु कोळी, नागो कोळी, गुलाब फौजी, बाळु धनगर, नामदेव येडवे, धनराज पाटील, हर्षल पाटील, विशाल पाटील यांनी विशेष योगदान दिले. याशिवाय प्रमुख पाहुणे म्हणून जामसिंग गिरासे, प्रशासकीय अधिकारी पुणे जि.प.(Dy ceo) पंचायत समिती सदस्य भारतदादा ईशी, कैलाश ईशी, मनोज निकम, आदिवासी कोळी समाज समन्वय समिती तसेच वाल्मिकी साम्राज्य ग्रुप, आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी व परिसरातील मान्यवर व आरावे गावातील तरुण, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.