महाराष्ट्र
त्रीज्योती महीला मंडळ आणि मनसेतर्फे हळदीकुंकू समारंभ कार्यक्रम सपंन्न
ठाणे (प्रतिनिधी) त्रीज्योती महीला मंडळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खोणी ग्रामपंचायत सदस्या जयश्री महेश ठोंबरे, मुकुंद गजानन ठोंबरे यांच्या पुढाकाराने व महेश रोहीदास ठोंबरे यांच्या माध्यमातून गोल्डन ड्रीम सेक्टर १० खोणी येथे हळदीकुंकू समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विभागातील महिलांनी आपला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमास प्रमुख पाहूण्या म्हणून मनसेचे आमदार राजुदादा पाटील यांच्या सौभाग्यवती योगिता (वहिनी) प्रमोद पाटील या उपस्थित होत्या. तसेच डोंबिवली शहर संघटक योगेश रोहीदास पाटील हे आणि वैशाली योगेश पाटील या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन आयोजकांनी केले असल्याने प्रमुख पाहुण्यांकडुन त्यांचे कौतुक करण्यात आले.