प्रेमापेक्षा देशप्रेम ठरते महत्वाचे !
व्हॅलेंटाईन डे विशेष : सैन्य दलातील धनंजय व स्नेहा पाटील यांची भावना
धुळे (स्वप्नील मराठे) प्रेम या अडीच अक्षरातच सर्वकाही सामावले असते. प्रेम व्यक्त करण्यासाठी नाना तन्हा वापरल्या जातात. मात्र देशाच्या संरक्षणासाठी अविरत सज्ज असलेल्या जवानांना मात्र आपले कर्तव्य महत्वाचे असते. त्यामुळे प्रेम आवश्यकच आहे. मात्र त्याहूनही देशप्रेम सर्वात महत्वाचे आहे, अशी भावना सैन्यदलात जवान असलेले धनंजय शिवाजी पाटील यांच्या धर्मपत्नी नेहा धनंजय पाटील यांनी व्यक्त केलेली आहे.
चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथील धनंजय शिवाजी पाटील हे सैन्यदलात असून, सध्या जैसलमेर (राजस्थान) येथे कार्यरत आहेत. त्यांच्या विवाहाची कहाणीही अतिशय रंजकच आहे. प्रत्येक मुला-मुलीला आपल्याला अनुरूप पती मिळावा. यासाठी आपल्याकडे मुलगा-मुलगी वाटते पहाणीचा कार्यक्रम नातेवाईकांच्या उपस्थितीत होत असतो. मात्र लग्नापूर्वीच सैन्यदलात असलेले धनंजय पाटील यांना रजा मिळाली नाही. त्यामुळे नेहा यांना प्रत्यक्ष होणाऱ्या पतीला बघता आले नव्हते. लग्नानंतर पतीने आपल्याला भरपूर वेळ द्यावा, फिरायला घेऊन जावे असे वाटत असते.