अखिल भारतीय पोलीस हक्क सरक्षक संघटनेच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी जितेंद्र जगदाळे यांची नियुक्ती
साक्री (प्रतिनिधी) अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदूरकर यांनी जितेंद्र जगदाळे यांना संघटनेचे धुळे जिल्हा उपाध्यक्षपदीचे नियुक्तीपत्र दिले. त्यात म्हटले आहे की, आपण संघटनेच्या उद्देशाप्रमाणे भारतीय पोलीस दलातील सर्व स्तरावरच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या समस्या आपल्या संघटनात्मक कार्यातून सोडवण्यासाठी सदैव तत्पर रहाल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रसंगी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष प्रा,युवराज काकूंस्ते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष विद्यानंद पाटील, जिल्हा महिला अध्यक्ष जागृती पाटील, साक्री तालुका महिला अध्यक्ष मयुरी बोरसे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शरद चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या या निवडी बद्दल पत्रकार जी. टी मोहिते, शरद चव्हाण, प्रकाश वाघ, ज्ञानेश्वर ढालवाले, कारभारी अहिरे, ज्ञानेश्वर शिवदे, आदींनी अभिनंदन केले. या प्रसंगी जिल्हा महिला अध्यक्ष जागृती पाटील यांनी संघटनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी याना सोबत घेऊन संघटनेच्या उद्देशाप्रमाणे कामकाज करण्यात येईल असे मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा युवराज काकूंस्ते यांनी केले तर आभार जितेंद्र जगदाळे यांनी मानले.