शिंदखेडा येथे शिवाजी महाराज स्मारक नियोजित जागेवर नारळ फोडून शिवजयंती साजरी
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील शिवाजी महाराज पुतळा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मनोहर एन एक्स कापड दुकानाजवळ स्टेशन रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी नियोजित जागेवर आज माजी नगरसेवक सुभाष देसले यांच्या हस्ते नारळ फोडून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अनेक प्रसंग मांडताना त्यांचे कार्य विषद केले.तसेच नियोजित जागेवर लवकरच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्यात येणार आहे असे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे अध्यक्ष गोविंद दादा मराठे यांनी सांगितले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दिपकदादा देसले, माजी नगरसेवक सुभाष देसले, सिनेट सदस्य अमोल मराठे, बबलू मराठे, अरुण देसले, दिपक चौधरी, रमा मिस्तरी, निलेश निकम, वासुदेव पाटील, सदानंद मराठे, कैलास मराठे, भैय्या पाटील, अनिल मराठे, योगेश चौधरी यासह समितीचे अध्यक्ष गोविंद दादा मराठे व पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.