देगलूर येथे शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
देगलूर (प्रतिनिधी) शिवजयंती निमित्त देगलुर शहरात शिवस्मारक येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन व सामूहिक जिजाऊ वंदना करून शिवजन्मोत्सव समिती 2022 यांनी नियोजित कार्यक्रमाला सुरुवात केली. मराठवाड्यातील सुप्रसिद्ध शाहीर सुरेश जाधव यांचा कार्यक्रम हजारो शिवप्रेमीच्या उपस्थित पार पडला. दुपारी 12 वाजता छत्रपती शिवराय व्याख्यान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
या वर्षी शिवजन्मोस्तव निमित्त रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत 4000 हुन अधिक विध्यार्थ्यांनि सहभाग नोंदवला. त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले आणि शिक्षकांना प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आले. शिवभक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि दरवर्षी प्रमाणे मुस्लिम बांधवांन कडून पाणी वाटपाचा उपक्रम सुद्धा ठेवण्यात आला आणि सायंकाळी आतिषबाजी करून महाराजांना वंदना करण्यात आली. या वर्षी शिवजन्मोस्तव समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भोकसखेडकर, दिगंबर रमेश कौरवार सचिव शिवजन्मोस्तव समिती, सचिन पाटील किणीकर, प्रशांत पाटील आचेगावकर, नामदेव थडके, राजू पाटील मलकापूरकर, नवनाथ पाटील, राहुल पेंडकर, विकास मोरे पाटील, तुकाराम यन्नावार, अमित पेंडकर यांनी परिश्रम घेतले.