लिंगायतांचा मुंबईत मोर्चा धडकणार - अॅड अविनाश भोशीकर
देगलूर (मारोती हनेगावे) अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे घेण्यात आलेल्या राज्य कार्यकारिणी बैठक पुणे येथे संपन्न झाली. त्यावेळी प्रत्येक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी सर्व पदाधिकार्यांच्या वतीने चर्चा करून मुंबई येथे 7 नोव्हेंबर 2022 ला देशव्यापी लिंगायत महामोर्चा होणार यावर बैठकीत चर्चा होऊन एकमत झाले.
आज पर्यंत देशातील पाच राज्यांमध्ये व दिल्ली येथे सुद्धा लिंगायतांचे लाखोंचा जनसमुदायाने शांततेत मोर्चा काढण्यात आले या मोर्चाची प्रमुख मागणी 1, लिंगायतांना धर्म मान्यता देणे 2,अल्पसंख्यांक दर्जा देणे ,3,आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर स्थापन करावे. अशा अनेक मागण्या साठी मोर्चा काढण्यात येणार आहे. असे राष्ट्रीय बसव दलाचे अध्यक्ष, व बसव ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष, लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक, अॅड, अविनाश भोशीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यासाठी शिष्टमंडळ लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत असे पत्रकारांना सांगितले यावेळी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी व असंख्य लिंगायत कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.