महाराष्ट्र

बोदवड येथील दत्त नगरमधील नागरिकांचा जीव धोक्यात

खंडेलवाल यांची रक्षा गॅस एजन्सी ठरणार जीवघेणी

बोदवड (प्रतिनिधी) शहरातील खान्देलवाल यांची रक्षा गॅस एजन्सी बोदवड शहरातील दत्तनगर भागात भर वस्तीत आहे. या ठिकाणी रक्षा गॅस एजन्सी चे गॅस गोडाऊन असल्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडल्यास ह्या ठिकाणच्या रहिवाशांच्या जीवित व वित्त हानीस कोण जबाबदार असा प्रश्न येथील रहिवासी उपस्थित करीत आहे. हे गोडाऊन भर वस्तीत असल्यामुळे गॅसचे भरलेले ट्रक येथे येन रस्त्यात उभे राहतात. त्यामुळे नागरिकांचे रस्त्यावरून ये-जा करण्यास हाल होतात.

तसेच भरलेल्या तसेच रिकाम्या हंड्या रिक्षात किंवा ट्रकमध्ये भरताना व खाली करताना होणाऱ्या आवाजामुळे नागरिकांना व्याधी निर्माण होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाने जीवित वा वित्तहानी ची वाट न बघता रक्षा गॅस एजन्सी विरोधात कठोर कार्यवाही करून सदर गॅस गोडाऊन शहराबाहेर इतरत्र हलवून, नागरिकांना जीवनदान द्यावे अशी अपेक्षा रहिवाश्यांमधुन व्यक्त केली जात आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे