एरंडोल

कंटेनरच्या धडकेत देवदर्शन करून घराकडे परतणाऱ्या भाविकांच्या गाडीस अपघात ; भाऊ-बहीण ठार, ५जखमी !

एरंडोल (प्रतिनिधी) जळगाव येथील नरेंद्र जैन यांचे कुटुंबिय बोरकुंड ता. जि.धुळे येथे देवदर्शन करून घराकडे परत जातांना एरंडोल येथे कृष्णा आँइल मिल जवळ त्यांच्या कारला मालवाहू कंटेनरने धडक दिली. त्यात प्रकाशचंद बाग्रेचा वय- ७४वर्षे व कमलबाई जैन वय-६५वर्षे रा. प्रतापनगर,जळगाव हे भाऊ-बहीण जागीच ठार झाले व कारमधील ५ जण जखमी झाले. ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर सायंकाळी ४ ते ४:३० दरम्यान घडली. २ गंभीर जखमींना जळगाव येथे हलविण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव येथील व्यावसायीक नरेंद्र जैन हे एम.एच.१९ सी.व्ही. ७७१७ क्रमांकाच्या वाहनाने बोरकुंड ता.जि.धुळे येथे ‘रामदेव ग्यारस, निमित्त आपल्या कुटुंबियांसह देवदर्शनास गेले व परतीच्या प्रवासात असताना समोरून येणार्या एम.एच.४६ बी.बी. ८५३२ क्रमांकाच्या मालवाहू कंटेनर ने जोरदार धडक दिली या दुर्घटनेत नरेंद्र जैन यांची आई कमलाबाई निहालचंद बम-वय ७९ वर्षे, व त्यांचे मामा प्रकाशचंद राजमल बागरेचा वय ७५ वर्षे हे दोघे जागीच ठार झाले. नरेंद्र जैन हे स्वत: वाहन चालवत होते.

अपघातात जखमी झालेल्या कारमधील व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे – योगीता नरेंद्र जैन,नरेंद्र जैन(वय-48),नमन नरेंद्र जैन,विजय शांतीलाल जैन,लभोनी नरेंद्र जैन. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,अनिल पाटील, जुबेर खाटीक, मिलींद कुमावत, काशिनाथ पाटील, पंकज पाटील आदी कर्मचारी व शहरातील किशोर निंबाळकर, सुनिल मराठे, डॉ.राजेंद्र चौधरी, राकेश चौधरी, बापू चौधरी, कृष्णा धनगर, बाळा पहेलवान, अजेंद्र पाटील आदी नागरीकांनी मदतकार्य केले.

एरंडोल ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ.कैलास पाटील यांनी जखमींवर प्रथमोपचार केले व गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले. जखमी लभोनी नरेंद्र जैन वय-१७वर्षे, नमन नरेंद्र जैन वय-१५वर्षे, नरेंद्र न्याहलचंद जैन वय-४९ हे एरंडोल येथील एका खाजगी रूग्णालयात तर विजय शांतीलाल जैन वय-५९ व विशाखा नरेंद्र जैन वय-१२वर्षे हे जळगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे