अशोक परदेशी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार समाजभुषण जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत
भडगाव (सतीश पाटील) तालुक्यातील वाडे येथील रहिवाशी व भडगावचे पञकार अशोक बापु परदेशी यांना आदर्श पञकार समाजभुषण जिवन गौरव पुरस्कार महाराष्टृ राज्य या राज्यस्तरीय पुरस्काराने शिवमल्हार गड भोर. जि. पुणे येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मानपञ व मानाची मल्हार पगडी या मराठमोळया सन्मानाने सन्मानीत करण्यात आले.
हा पुरस्कार शिव मल्हार गड, शिवमल्हार प्रतिष्ठान व वाघ्या मुरळी परीषद महाराष्टृ राज्य यांच्या मार्फत प्रदान करण्यात आला. शिव मल्हार गड भोर जि. पुणे येथे दि. २ मार्च २०२२ रोजी महाशिवराञीच्या दुसर्या दिवशी आयोजीत शिव मल्हार महोत्सवात पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पञकार अशोक बापु परदेशी यांचे सर्वस्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सोहळयास माजी गृहराज्य मंञी रमेश बागवे, शिवमल्हार गडाचे अध्यक्ष तथा वाघ्या मुरळी परीषद महाराष्टृ राज्याचे अध्यक्ष प. पु. सदगुरु मार्तंड रामचंद्र साठे, मार्तंड देवस्थान जेजुरीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, महाराष्टृ राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष कृष्णा रांजणे, महाराष्टृ केसरी रावसाहेब मगर, पोलीस निरीक्षक दबडे, कुस्तीगीर संघाचे मोहन खोडपे, डाॅ. संजय देवकर, प्रा. डाॅ. ज्ञानेश्वर शिंदे, यांचेसह काही प्रमुख मान्यवर उपस्थित होते. मल्हार गडाचे अध्यक्ष तथा वाघ्या मुरळी परीषद महाराष्टृ राज्याचे अध्यक्ष प पु सदगुरु मार्तंड रामचंद्र साठे यांचेसह उपस्थितीत मान्यवरांचे हस्ते पञकार अशोक बापु परदेशी यांचे परीवारासह मानपञ व मल्हार गडाची मानाची पगडी देउन पुरस्काराने सन्मानीत केले.
यावेळी वाडे येथील माजी उपसरपंच ऊषाबाई अशोक परदेशी, विमलबाई परदेशी बहाळ, रोहन परदेशी, मोहीत परदेशी आदि परीवार तसेच वाडे येथील सरस्वती वही मंडळाचे अशोक माळी, अरुण महाजन, पांडुरंग पाटील, गणेश विसपुते, किशोर गाडीलोहार, धामणगावचे विलास वाघ आदि नागरीक हजर होते. आपण गेली अनेक वर्षे कला, क्रिडा, सामाजीक, शैक्षणिक, आर्थीक, सांस्कृतीक,कृषी,व्यापार अशा अनेक विविध क्षेञासाठी आपली लेखनी चालवुन वर्तमान पञाच्या माध्यमातुन योग्य तो न्याय देण्याचे महान कार्य केल्याबद्दल आम्ही आपणास शिव मल्हार गडाच्या वतीने आदर्श पञकार समाजभुषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करीत आहोत. असे मानपञात नमुद केलेले आहे. सामाजीक , पञकारीता, शैक्षणिक , पञकारीता क्षेञात अशोक बापु परदेशी यांची अतिशय चांगली कामगीरी आहे. कोरोना काळातही त्यांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी कोव्हीड सेंटरला वेळोवेळी जाउन सहकार्यासाठी मौलीक मदत केलेली आहे. त्यांना लोकप्रतिनिधी व अधिकार्यांनी कोरोना योद्धा पुरस्काराने वेळोवेळी सन्मानीत केलेले आहे. सामाजीक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असतात. गोरगरीबांसह , शेतकरी, नागरीकांच्या मदतीला ते नेहमी धावत असतात. त्यांचे सामाजीक क्षेञातही चांगले योगदान आहे. त्यांना हा आदर्श पञकार समाजभुषण जिवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे जळगाव जिल्हयासह सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.